दुर्घटना टळली. छोटी चिमणी धडकली 174 प्रवाश्यांना घेवून जाणाऱ्या विमानाला.| Delhi Latest News

2021-09-13 1

दिल्लीहून पटना ला जाणारे गो एअर चे एक विमान मोठ्या अपघातातून वाचले आहे. विमानाचे उड्डाण होताच एक चिमणी विमानाला धडकली ह्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ह्यानंतर कळले कि विमान G8 140 उडताच विमानाच्या इंजिन मध्ये एक चिमणी घुसली. ह्याची माहिती मिळताच विमानात भीतीचे सावट पसरले. आणि विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ह्या घटनेतून 174
प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. आधी तर वैमानिकाला छोटा झटका बसला. आणि इंजिनमधून धूर निघू लागला. वैमानिकाने लगेच हि माहिती कंट्रोल रूम ला दिली आणि कंट्रोल रुमच्या अनुमतीने विमानाचे आपत्कालिन लँडिंग केले. हि घटना दुपारी 12 च्या आसपास घडली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires